पत्रकाराला मनपाकडून नोटिस, नगरमध्ये तालीबानची राजवट आहे का? प्रा.बेरड यांचा संतप्त सवाल...video

प्रश्न विचारल्याने पत्रकाराला मनपाकडून नोटिस, नगरमध्ये तालीबानची राजवट आहे का? प्रा.बेरड यांचा संतप्त सवालनगर : नगरमध्ये महापालिकेमार्फत सुरु असलेल्या लसीकरणासंदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्याने नगर महानगरपालिकेने दै.सामनाचे प्रतिनिधी मिलिंद देखणे यांना नोटीस बजावून खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. महानगरपालिकेच्या या कृतीचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. पत्रकारांमधून या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत असताना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनीही या प्रकारावर टिका करीत नगरमध्ये तालीबानची राजवट आहे का? असा सवाल विचारला आहे. बेरड यांनी सदर प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

video-0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post