शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर भर रस्त्यात हल्ला..

शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर भर रस्त्यात हल्ला.. बीड : बीडमध्ये  शिवसेना  उपजिल्हाप्रमुख यांच्यावर   हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बीड- परळी महामार्गावरील घोडका  राजुरी   परिसरात हा हल्ला झाला आहे. हनुमान जगताप असे जखमी शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचे नाव आहे. त्यांच्यावर बीड शहरातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  या विषयी जखमी हनुमान जगताप म्हणाले, की २ दिवसापूर्वी शिवसेना मंत्री संदीपान भुमरे बीडमध्ये आले असता, त्यांच्यासमोर मी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांसह इतर सत्ताधार्यां विषयी तक्रार केली होती. आणि त्याच्यानंतर मला ही मारहाण करण्यात आली आहे. असा संशय जखमी   जगताप यांनी व्यक्त केला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post