जिल्हा परिषद ग्रामिण पाणी पुरवठा कार्यालयातील वाहन चालक विजय बनसोड सेवानिवृत्त

 जिल्हा परिषद ग्रामिण पाणी पुरवठा कार्यालयातील  वाहन चालक विजय बनसोड सेवानिवृत्त ग्रामिण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अहमदनगर या कार्यालयातील वाहन चालक विजय बनसोड ३३ वर्षाच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर नियत वयोमानाने ३१ जुलै,२०२१ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले असून सन १९८८ साली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहमदनगर येथुन शासकीय सेवेला सुरूवात केली. सन २०१५ पासुन ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अहमदनगर येथे वाहन चालक येथे या पदावर काम करतांना सर्वांचे मने जिकली होती. बनसोड यांनी त्याच्या सेवेत विना अपघात वाहन चालवून चांगल्या प्रकारे शासकीय सेवा केल्याचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ यांनी निरोप समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले. सदर कार्यक्रमाचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील व पाणी व स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post