अफगाणीस्तानातील तालीबानी राजवटीचा महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना फटका...वाचा सविस्तर

अफगाणीस्तानातील तालीबानी राजवटीचा महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना फटका...वाचा सविस्तर सोलापूर : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी वर्चस्व मिळवल्यानंतर त्याचा थेट परिणाम सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा तालुक्यातील केळी निर्यातीवर झाला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारताकडून अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात केळी निर्यात केली जाते. मात्र या केळी निर्यातीचे करार रद्द केले आहेत.  

भारतातून अफगाणिस्तानात दर वर्षी किमान 30 टक्के केळी निर्यात होते.‌ दरम्यान अफगाणिस्तानात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे केळीची निर्यात थांबली आहे. अफगाणिस्तान हा इराण नंतरचा भारतातून केळी आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. माळशिरस तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केळीचे उत्पादन केलंय. मात्र सध्या हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post