मुदत संपलेल्या शिक्षक बँक संचालकांच्या कारभाराला सदिच्छा मंडळाचा विरोध

 मुदत संपलेल्या शिक्षक बँक संचालकांच्या तुघलकी कारभाराला सदिच्छा मंडळाचा विरोध---जिल्हा कार्याध्यक्ष श्री बाबासाहेब आव्हाड



प्राथमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या प्राथमिक शिक्षक बँकेचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला आणि बँकेचे राजकारण तापण्यास सुरवात झाली आहे.संचालक मंडळाची मुदत फेब्रुवारी २०२१ मध्येच संपलेली असली तरी कोविड १९मुळे या संचालक मंडळाला  मुदतवाढ मिळाली आणि या भ्रष्ट संचालक मंडळाने जाता जाता बँकेच्या तिजोरीवर व सभासदांच्या ठेवींवर आडवा हात मारला असून या संचालक मंडळाला थोडी जरी चाड असेल तर या संचालकांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री बाबासाहेब आव्हाड यांनी केली आहे.

                   बँकेची 102 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या 29 ऑगस्ट रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार असून बँकेचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला आहे.या अहवालात अनेक तुघलकी पोटनियम दुरुस्ती संचालक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेले दिसून येतात,यामध्ये मयत सभासद कर्जनिवारण निधीचे नाव बदलून त्यास सभासद कर्जनिवारण व थकबाकीदार कर्जनिवारण  निधी असे नाव देण्याचा घाट घातला जात आहे.ज्यामुळे भविष्यात याचा मर्जीतल्या थकबाकीदारांचे कर्ज निवारण केले जाऊन बँक अडचणीत येण्याची शक्यता आहे,यानिधीमध्ये प्रत्येक एप्रिल महिन्यात 100 रु ने वाढ प्रस्तावित केली आहे.त्याचप्रमाणे सभासदाच्या खात्यावरील मयतनिधीतून 7000 रुपये कर्जनिवारण निधीत घेतले जाणार असून यामुळे सभासदांना मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे.त्याचप्रमाणे कुटुंब आधार निधी 150 रुपयाऐवजी500 रुपये घेण्याचे प्रस्तावित आहे,म्हणजेच हि वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडल्यानंतर तब्बल ८५५० रुपये सभासदांवर भार टाकला जाणार आहे.एकीकडे सभासदांच्या पगारात वाढ व्हावी म्हणून कायमनिधी कमी करणारे संचालक मंडळ दुसऱ्या हाताने सभासदांच्या खिशात हात घालत असून हा दुटप्पीपणा उघड झाला असल्याचं राजेंद्र शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

         त्याचप्रमाणे बँकेचा गेल्या तीन वर्षांचा विचार करता सी डी रेशो सातत्याने वाढत असून आज बँकेचा सी डी रेशो ७६.०९ टक्के आहे.याआधी सी डी रेशो वाढल्यामुळे बँकेस रिझर्व्ह बँकेने दोन कोटींचा दंड ठोठावला होता,परंतु सदिच्छा मंडळ सत्तेत आल्यानंतर हा दंड माफ करूण घेण्यात यश मिळाले होते. हा रेशो असाच वाढत राहिल्यास रिझर्व्ह बँकेचे निर्बंध लागून बँकेचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली।आहे. सदिच्छा मंडळाने आपली कार्यकाळात सुरु केलेली ए टी एम सुविधा कार्यान्वित करण्यास या संचालक मंडळाला 5 वर्ष लागले असून सेव्हिंग खातेदाराच्या मागणीनुसार ए टी एम कार्ड देणे आवश्यक असताना ,कोणताही विचार न करता गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने आर्थिक तरतूद केली जात आहे. सन २०१९-२०साठी ७लाख १२ हजार रुपये व 2020-21 साठी तब्बल 13 लाख 72 हजार रुपयांची खर्च करण्यात आली असून पुढील वर्षासाठी देखील ६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.सेव्हिंग खातेदारांची नाममात्र मागणी असताना आतापर्यंत ए टी एम छपाईवर जवळपास २६लाख रुपये खर्च करण्याची मानसिकता उघड झालीआहे.

         गेल्या दीड वर्षांपासून कोव्हिडची महामारी चालू असून प्रवासावर निर्बंध असताना देखील संचालकांनी गेल्या वर्षीच्या मिटिंग ६६१ वरून उडी मारून अहवाल सलात ७१० मिटिंग घेऊन विक्रम घडबला आहे व त्यासाठीप्रवास भत्याचा खर्च२६ लाख ४३ हजार ६२९ रुपयांवरून ३०लाख ९०हजार ६९रुपयांवर केला आहे हा प्रवास नेमका कोणत्या वाहनाने व कोणत्या मार्गाने केलाआहे याचा हिशेब संचालकांनी पारदर्शीपणे  सभासदाना दिला पाहिजे.त्याचप्रमाणे गेल्या वर्षी झालेल्या ऑनलाइन वार्षिक सभेचा खर्च तब्बल 3 लाख 28 हजार दाखवण्यात आला आहे.सभा जर ऑनलाइन घेण्यात आली होती तर हा खर्च नेमका कोणासाठी करण्यात आला याचा खुलासा करावा अशी मागणी सदिच्छा मंडळाने केली आहे.

        येत्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या तुघलकी निर्णयांना सदिच्छा मंडळ कडाडून विरोध करणार असल्याचं सदिच्छा मंडळाचे नेते राजेंद्र शिंदे,रवींद्र पिंपळे,अनिल आंधळे,नवनाथ तोडमल, बाळासाहेब खिलारी,ज्ञानेश्वर माळवे,विनोद फलके,गहिनीनाथ शिरसाठ,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष माधव हासे ,सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत,कार्याध्यक्ष  दादा वाघ,शैलेश खनकर ,बाळकृष्ण डमाळ,राजाभाऊ बेहळे,बबन गाडेकर,रहिमान शेख,चंद्रकांत मोरे सुधाकर बुऱ्हाडे गणेश पिंपळेआदींनी दिला आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post