नगर तालुका शिवसेनेच्या प्रयत्नांना यश . व्याजाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर होणार वर्ग

 नगर तालुका शिवसेनेच्या प्रयत्नांना यश

व्याजाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर होणार वर्ग- भगतनगर,ता.21- शेतकरी कर्जदारांनी सेवा सोसायटीकडे भरलेल्या व्याजाची रक्कम शेतकर्‍यांना मिळण्यासाठी नगर तालुका शिवसेनेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश तालुका उपनिंबधक रत्नाळे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिले आहेत, अशी माहिती शिवसेनेचे नगर तालुकाप्रमुख राजेंद्र भगत यांनी दिली.

यासंदर्भात तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण कोकाटे, प्रकाश कुलट, जीवाजी लगड आदींसह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नगर तालुका उपनिंबधक रत्नाळे यांची भेट घेतली होती. शेेतकर्‍यांना व्याजाची रक्कम देण्यास जिल्हा बँकेकडून टाळाटाळ केली जात असल्याचे भगत यांनी उपनिबंधक रत्नाळे यांच्या निदर्शनास आणून दिले. सेवा सोसायटीच्या कर्जाची नवे-जुने फेड करताना शेतकर्‍यांनी व्याजाची रक्कम भरली होती. मात्र, राज्य शासनाने ही सहा महिन्यापूर्वीच वर्ग केली होती. परंतु, जिल्हा बँकेकडून सदर रक्कमेबाबत टाळाटाळ करण्यात येत होती, यासंदर्भात शिवसेना पदाधिकार्‍यांनी उपनिबंधक रत्नाळे यांच्याशी चर्चा केली. सध्या करोनाचे संकट आहे. त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आहे. अशा स्थितीत शेतकर्‍यांना मदत करणे गरजेचे असताना बँकेकडून त्यांना वार्‍यावर सोडण्यात आले आहे, असे राजेंद्र भगत यांनी निदर्शनास आणून दिले. शासनाने सहा महिन्यापूर्वीच सदर रक्कम वर्ग केली आहे, असे सांगत उपनिबंधक रत्नाळे यांनी बँकेच्या अधिकार्‍यांना यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शेतकर्‍यांनी जे व्याज भरले होते ते लवकरच जमा होईल, असे त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post