"हमारी छोरियां भी छोरो से कम नही" पाथर्डीच्या आयुषीची वायूदलात ‘फायटर पायलट’ म्हणून निवड

 

पाथर्डीच्या आयुषीची वायूदलात ‘फायटर पायलट’ म्हणून निवडनगर (सचिन कलमदाणे): पाथर्डीतील डॉ.नितीन व डॉ.मनिषा खेडकर यांची कन्या आयुषी हिची भारतीय वायूदलात फायटर पायलट म्हणून निवड झाली आहे. आयुषीने अतिशय जिद्दीने थेट हवाई दलात केलेली ही मोठी कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बनली आहे. दरम्यान राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही आयुषीचे विशेष कौतुक केले असून तिचे यश अभिमानास्पद असल्याचे व्टिट केले आहे.

पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की,

"हमारी छोरियां भी छोरो से कम नही" पाथर्डी चे आमचे डॉ. नितीन व डॉ. मनीषा खेडकर यांची कन्या कु. आयुषी नितीन खेडकर हिची भारतीय वायू सेनेमध्ये वैमानिक FIGHTER PILOT IN INDIAN AIR FORCE म्हणून निवड झाली आहे. त्या बद्दल तिचे अभिनंदन! आयुषी तुझा आम्हाला अभिमान आहे. आमदार मोनिका राजळे यांनीही आयुषीच या कामगिरीसाठी कौतुक करीत तुझ्या पंखांना अशीच भरारी घेण्याचे बळ मिळो, अशा शुभेच्छा दिल्यात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post