अयोध्येत 498 वर्षानंतर रामलल्ला चांदीच्या झुल्यावर विराजमान...video

अयोध्येत 498 वर्षानंतर रामलल्ला 21 किलो चांदीच्या झुल्यावर विराजमानअयोध्या :  : रामजन्मभूमी संकुलातील तात्पुरत्या मंदिरात विराजमान असलेले रामलल्ला नागपंचमीच्या दिवशी 21 किलो चांदीच्या झुल्यावर विराजमान झाले. हा झुला श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने तयार केला आहे. मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या मते, तब्बल 498 वर्षांच्या मंदिर विवादानंतर प्रथमच भगवान रामलल्ला चांदीच्या झुल्यावर विराजमान झाले आहेत. आता श्रावण झुला मेळाव्यादरम्यान श्रावण पौर्णिमेपर्यंत त्याचे दर्शन झुल्यावर विराजमान असलेल्या रुपातच होईल.

रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की न्यायालयाच्या आदेशावरुन मंदिर-मशिदीच्या वादाच्या वेळी रामलल्ला लाकडी झुल्यावर बसवून झुलनोत्सव साजरा केला जात होता. आता राम मंदिराच्या बाजुने सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर राम मंदिर बांधले जात आहे. प्रत्येक कार्यक्रमात भव्यता आणली जात आहे. यादरम्यानच रामलल्ला चांदीच्या झुलामध्ये विराजमान झाले आहेत. कजरी गीत ऐकून त्यांना प्रसन्न करण्यात आले.

video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post