स्मशानभूमीसाठी जागा देण्यास अरणगावकरांचा तीव्र विरोध

 अरणगावकरांचा महानुभव आश्रमसाठी स्मशानभूमी करिता जागेला तीव्र विरोधनगर : - अरणगाव मधील गट नं. ८५ मधील काही क्षेत्र परस्पर  बुरुडगाव येथील महानुभव आश्रम करिता स्मशान भूमी साठी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा न करतच आदेश काढला . या निर्णयाला अरणगाव येथील ग्रामस्थांनी जाहीर निषेध करत स्मशानभूमीसाठी जागा देण्यास तीव विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी सरदिल यांना देण्यात आले .

निवासी उपजिल्हाधिकारी. संदिप नीचित यांची  भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व म्हणणे मांडले असता योग्य ती चौकशी करून कारवाई होईल असे आश्र्वासन निवसी उपजिल्हाधिकारी यांनी दिले .  सदरील क्षेत्र पूर्णपणे गायरान आरक्षित आहे . शेजारी  लोकवस्ती आहे व शेतकरी शेती कसून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत, ज्या महानुभव आश्रम करिता ही जागा देण्याचे नियोजीले आहे त्या महानुभव आश्रमाचा आणि अरणगाव ग्रामपंचायत यांचा काहीही संबंध नसतात प्रशासकीय पातळीवर हा निर्णय अरणगाव ग्रामस्थांसाठी पूर्णपणे अन्यायकारक आहे, सदरील आश्रम बुरुडगाव हद्दीत असून त्यांचा महसूलकर बुरुडगाव ग्रामपंचायतीस जमा होतो त्यामुळे त्यांना त्यांच्या स्मशानभूमी करिता बुरुडगाव हद्दीत जागा देऊन व्यवस्था करावी.यावेळी  सरपंच स्वाती मोहन गहीले, उपसरपंच लता रंगनाथ शिंदे ,. महेश पवार, बबन करांडे, रंगनाथ शिंदे, सुभाष पुंड, गौतम जाधव,  प्रशांत गाहिले, राजेश कांबळे, मोहन गाहिले,  सूर्यभान जाधव तसेच ग्राम विकास अधिकारी रासकर अरणगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post