काम कोण करतं आणि हार दुसरे घालून जातात, अमृता फडणवीस यांचा थेट अजित पवारांवर निशाणा

काम कोण करतं आणि हार दुसरे घालून जातात,  अमृता फडणवीस यांचा थेट अजित पवारांवर निशाणा पुणे:  उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन पार पडली. अजित पवारांनी मेट्रोचे उद्घाटन केलं. या उद्घाटनावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसयांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

काम कोण करतं आणि हार दुसरे घालून जातात, असं म्हणत मेट्रो उद्घाटनावरुन अमृता फडणवीसांनी सत्ताधारांना टोला हाणला आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. यावेळी पत्रकारांनी त्यांना पुणे मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या निमंत्रणावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post