नगरमध्ये सोमवारपासून 4 नंतर दुकाने बंद....मनपा प्रशासनाने केला महत्त्वाचा खुलासा

 नगरमध्ये सोमवारपासून 4 नंतर दुकाने बंद....मनपा प्रशासनाने केला महत्त्वाचा खुलासानगर : दोन तीन दिवसांपासून नगरमध्ये पुन्हा कडक निर्बंधांची चर्चा सुरु असून सोमवारपासून दुपारी 4 नंतर सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे बोलले जात आहे. सोशल मिडियातूनही अशा आशयाचे मेसेज व्हायरल झाले आहेत. मात्र आता नगर मनपाने मोठा खुलासा केला असून दुकाने 4 नंतर बंद होणार ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. मनपाच्या सोशल मिडिया अकाउंटवर याबाबतचा खुलासा टाकण्यात आला आहे. निर्बंधांबाबत शासनाचा कुठलाही आदेश आलेला नसून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post