मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी ? माजी मंत्री कर्डिलेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

 


मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी ? माजी मंत्री कर्डिलेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष नगर : नगर महापालिकेत सत्तांतर होवून शिवसेना व राष्ट्रवादीचे वर्चस्व स्थापित झाले आहे. त्याचवेळी विरोधी पक्षनेतेपदावरुन भाजपमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. यापार्श्वभूमीवर मनपात विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सोडविण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे कर्डिलेंच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

विरोधी पक्ष नेतेपदासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर मालन ढोणे, शहराध्यक्ष भैय्या गंधे, मनोज कोतकर हे इच्छुक आहेत. या नगरसेवकांनी सह्यांची मोहीमही सुरु केली होती. मात्र प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी हस्तक्षेप करीत सर्वांची एकत्रित बैठक घेवून कर्डिलेंकडे हा तिढा सोडविण्याची जबाबदारी दिली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post