धक्कादायक...पतीने केला पत्नीचा खून नगर जिल्ह्यातील घटना

 धक्कादायक...पतीने केला पत्नीचा खून नगर जिल्ह्यातील घटनाराहुरी-मयत अलका वसंत शिंदे (वय ४५) हिने पती वसंत लक्ष्मण शिंदे (रा. गुंजाळे, ता. राहुरी ) याच्याकडे मुलाला भेटण्यासाठी बांगर्डे (ता. श्रीगोंदा) येथे जाण्याचा आग्रह धरला. परंतु वसंत याने अलका हीस मुलाकडे जाण्यास विरोध केला. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याची भांडणे झाली. त्यात रागाच्या भरात अलका हिच्या डोक्यावर व छातीवर धारदार हत्याराने वार केले. त्यामध्ये अलका हिचा जागेवरच मृत्यू झाला.गुरुवारी सकाळी ७ वाजता वसंत मुलीकडे गेला. तुझी आई झोपलेली आहे. तिला जाऊन बघ असे त्याने मुलीला सांगितले व तेथून पळून गेला. त्यानंतर मुलगी बाली हिने तात्काळ वांबोरी पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. श्रीरामपूरचे विभागीय उपाधीक्षक संदीप मिटके, राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस उपनिरीक्षक शंकरसिंग राजपूत, पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र डावखर, वांबोरीचे पोलीस हवलदार चंद्रकांत बराटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष राठोड, पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. लपून बसलेला आरोपीचा स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेऊन ताब्यात घेतले त्यानंतर गुन्ह्याचा उलगडा झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post