तहसीलदारासह शिपाई 1 लाख वीस हजार रुपयांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात

 तहसीलदारासह शिपाई 1 लाख वीस हजार रुपयांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यातनवी मुंबई : जमिनीच्या हरकतीचा अहवाल देण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना तहसीलदार आणि त्यांच्या शिपायाला लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली आहे. सोमवारी (30 ऑगस्ट) दुपारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दिपक आकडे यांनी पनवेलचे तहसीलदार म्हणूनही काम पाहिले आहे. तहसीलदार दीपक आकडे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची बदली कल्याण येथे झाली होती. जवळपास चार वर्ष ते पनवेल येथे कार्यरत होते.

कल्याण तालुक्यातील वरप गावामधील एका बांधकाम कंपनीची जमीन विकसित करण्याचे काम कल्याण येथे सुरु आहे. या जमिनीबाबत हरकती सुनावणीचे काम कल्याण तहसील कार्यालयात पडताळणीसाठी सुरु होते. त्याचा अहवाल देण्यासाठी तहसीलदार दीपक आकडे (वय 45) आणि त्यांचा शिपाई बाबू उर्फ मनोहर हरड (वय 42) यांनी 1 लाख 20 हजार रुपयांची मागणी केली होती.

याबाबत संबधित कंपनीच्या प्रशासनाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास 1 लाख 20 हजारांची लाच घेताना तहसीलदार आकडे आणि शिपाई हरड यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस यांनी रंगेहाथ अटक केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post