भयावह बदल...अफगाणीस्तानात तालीबानींची राजवट, महिलांची पुरती कोंडी...


भयावह बदल...अफगाणीस्तानात तालीबानींची राजवट, महिलांची पुरती कोंडी... नवी दिल्ली :   राष्ट्रप्रमुखांनीच देशातून काढता पाय घेतला आणि एका अर्थी तालिबानची पकड अफगाणिस्तानच्या नव्या पर्वाची सुरुवात करुन गेली. भीती आणि दहशतीचं हे पर्व पाहता देशातील अनेक नागरिकांनी जीवाच्या आकांतानं देश सोडण्याचा प्रयत्न केला. यातील काही यशस्वी झाले, तर काहींना अद्यापही तालिबानच्या तावडीतून सुटका करणं शक्य झालेलं नाही. सोशल मीडियावर माध्यमांच्या काही प्रतिनिनीधींनी अफगाणिस्तानातील विदारक परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे. अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबुल येथे अनेक रस्त्यांवर तालिबानची माणसं गस्त घालताना दिसत आहेत. अफगाण महिलांच्या दृष्टीनं हे अतिशय वाईट पर्व असल्याचं खंत सध्या सत्र स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे. काबूलवर तालिबानची सत्ता आल्यानंतर इथं सलून, पार्लर, टेलरची दुकानं, प्लास्टिक सर्जरी सेंटर अशा ठिकाणी असणारे महिलांचे पोस्टर आणि छायाचित्र हटवण्याचं काम सुरु आहे. तालिबानच्या दहशतीमुळं हे चित्र पाहायला मिळत आहे. अफगाणिस्तानात काही वाहिन्यांनी दैनंदिन कार्यक्रमांवजी इस्लाम धर्माशी संबंधीत कार्यक्रम दाखवण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी महिला सूत्रसंचालकांना दाखवण्यास बंदी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post