पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीवर 5 जणांनी केला हल्ला

 पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीवर प्राणघातक हल्ला...नगर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी सादीक बिराजदार याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस रविवारी रात्री साडेसात वाजता आरोपीच्या घरी गेले होते. त्याला घेऊन जात असताना पाच आरोपींनी भिंगार  नाल्याजवळ पोलिसांचे वाहन अडवून सादिकला मारहाण केली.    सादिक लाडलेसाहब बिराजदार (वय 32 रा. मुकुंदनगर) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सादिक याची पत्नी रुक्सार बिराजदार (22) हिने दिलेल्या फिर्यादीवरून मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद,  रशीद रसुल सय्यद,  कुददुस रशीद सय्यद, मोईन मुनीया उर्फ अजीम सय्यद, अर्शद मुनीया उर्फ अजीम सय्यद सर्व रा. दर्गादायरा (रा. दर्गादायरा, मुकुंदनगर) यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मी प्रत्यक्षात पाहिली असल्याचे रुक्सार सादिक हिने फिर्यादीत नमूद केले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post