जिल्हा परिषदेत अधिकार्यांच्या बदल्या...'हे' नवीन अधिकारी येणार

 जिल्हा परिषदेत अधिकार्यांच्या बदल्या



नगर:  जिल्हा परिषद अधिकार्‍यांच्या बदलीला सुरूवात झाली आहे. जि.प. संपूर्ण स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आणि महिला आणि बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम यांची बदलीचे आदेश आले.

यादव यांना पदोन्नती असल्याने त्यांना नेमणुकीच्या ठिकाणाची प्रतिक्षा असून त्यांच्या जागेवर संगमनेरचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांची नगरला जिल्हा परिषदेत बदली झाली आहे. दुसरीकडे मुळचे नगर जिल्ह्याचे रहिवासी असणारे आणि सातारा जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले मनोज ससे यांची नगर जिल्हा परिषदेतील महिला आणि बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी पदावर बदली झोली आहे.

 कृषी विभागातील जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी  यांची नंदूरबार जिल्ह्यात उपसंचालक कृषी (आत्मा) या पदावर बदली झाली असून त्यांच्या जागेवर अकोले तालुक्यातील रहिवासी असणारे आणि चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असणारे शंकर किरवे यांची बदली झाली आहे. .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post