'मौत का पैगाम तुम्हारे और फॅमिली के नाम', जि.प.शाळेतील शिक्षकाला गोळ्यांसह धमकी पत्र

 

मौत का पैगाम तुम्हारे और फॅमिली के नाम, जि.प.शाळेतील शिक्षकाला गोळ्यांसह धमकी पत्रठाणे : जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाला आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी एका पत्राद्वारे मिळाली असून त्यासोबतच दोन बंदुकीच्या गोळ्यासुद्धा पाठवण्यात आल्या होत्या. 14 ऑगस्ट रोजी संतोष पांडुरंग साबळे (वय 38) हे केतकीपाडा दहिसर येथे राहणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांना भेटायला गेले होते, त्यांच्या दरवाजाबाहेर एक लाकडी बॉक्स ठेवला गेला होता. तो संतोष साबळे यांच्या नजरेस पडला. त्या लाकडी बॉक्समध्ये एक पत्र होतं ज्यावर संतोष साबळेचं नाव लिहिलं होतं.


संतोष साबळे हे गेल्या दहा वर्षापासून वसई परिसरात राहतात आणि ते अधूनमधून त्यांच्या आई-वडिलांना भेटायला दहिसरमध्ये येत असतात. संतोष साबळे यांनी जेव्हा ते पत्र उघडलं तेव्हा त्याच्यात हिंदीमध्ये त्याच्यासाठी एक निरोप लिहिला होता, त्यात लिहिलं होतं की "मौत का पैगाम तुम्हारे और फॅमिली के नाम" इतकच नाही तर त्या पत्रासोबत दोन बंदुकीच्या गोळ्यासुद्धा ठेवण्यात आल्या होत्या, हे पत्र वाचताच संतोष साबळे यांनी  लगेच स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post