हमको भी 'लिफ्ट' करा दो ! , जि.प.सदस्यांचा प्रशासनाकडे आग्रह

 जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाची दीड वर्षापासून लिफ्ट बंद नगर (सचिन कलमदाणे): गेल्या दिड वर्षांपासून मुख्यालयाची लिफ्ट बंद आहे. त्यामुळे अनेक लोकांचे हाल होत आहेत.वयस्कर लोकं व अपंग लोक कामा निमित्त येत असतात. परंतु लिफ्ट बंद असल्यामुळे तिसऱ्या चौथ्या मजला पार करायला अतोनात हाल होतात. काहींनी तर जि. प. मध्ये येणेच बंद केले आहे. जिल्ह्याचा एवढा मोठा कारभार पाहणारी संस्था पण दीड वर्षात साधी लिफ्ट दुरुस्त करू शकत नाही.आर्थिक हितसंबंध असणारे टेंडर गाड्या विशेष बाब म्हणुन त्वरीत होतात. मग लिफ्ट काम विशेष बाब म्हणून का होत नाही असा प्रश्न भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यातील अनेक पंचायत समितीच्या सहा सात कोटी रुपयांच्या इमारती बांधल्या.तिथल्या वीज कनेक्शन कट केले आहे. त्या मुळे संगणक बंद आहेत, पंखे बंद आहेत. साफसफाईचे टेंडर संपले म्हणून  सफाई बंद आहे.आता अशा ठिकाणी घाणीचे साम्राज्य होत आहे. अधिकाऱ्यांना या बाबत विचारणा केली असता त्याला तरतूद नाही असे सांगतात. मग कोट्यवधी रुपयांच्या इमारती बांधल्या कशाला ? 

अधिकारी पदाधिकारी यांनी ह्या विषयाकडे त्वरीत लक्ष देणे गरजेचे आहे नाही तर आम्हाला प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा जालिंदर वाकचौरे व  सोमनाथ पचारणे यांनी दिला आहे.

जि प सदस्य ।।

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post