दहावीच्या निकालात चुकीचे 'मूल्यमापन', नगरमधील 'या' शाळेवर पालकांचा संताप... video

 यशश्री अकॅडमीच्या दहावीच्या निकालाबद्दल पालकांनी केला संताप व्यक्तनगर: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक पालकांनी मूल्यमापनावर आक्षेप घेतला आहे. नगरमधील यशश्री ॲकॅडमीबाबतही पालकांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत. पालकांनी शाळेत नाव घेऊन शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला.परंतू शाळेने या विषयावर मौन बाळगले आहे.

  दहावीचा निकाल अतिशय चुकीच्या पद्धतीने लावला गेला असा पालकांचा आरोप आहे. ज्या विद्यार्थ्यांना आठवी आणि नववी  मध्ये 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले होते अशा विद्यार्थ्यांना 60 ते 70 टक्के गुण देऊन मोठी चूक केलेली आहे.मूल्यमापन व्यवस्थितपणे झाले नाही असा सर्व पालकांचा आरोप आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्याला सर्वस्वी विद्यालय जबाबदार आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता लक्षात न घेता विद्यार्थ्यांना अंदाजे मार्क दिले की काय अशी शंका पालकांनी उपस्थित केली.अनेक पालकांनी मागील दोन वर्षाचा निकाल आणून त्यांच्या मुलांची बौद्धिक गुणवत्ता कशी चांगले आहे, तरीदेखील त्या विद्यार्थ्यांना गुण कसे कमी दिले हे दाखवण्याचा प्रयत्न केला.परंतु प्रशासनाने यावर मौन बाळगले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. त्याला कोण जबाबदार हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अकरावीच्या एडमिशन साठी जरी सीईटी ठेवलेली असली तरी दहावीचे गुण हे आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा अजूनही आपण मानतो‌ आणि याचा अजिबात न विचार करता शाळेने जो सावळा गोंधळ दाखवलेला आहे त्याची दखल सीबीएसई बोर्डाने देखील घ्यावी अशी पालकांची मागणी आहे.

Video bite पालक

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post