फिर्यादी पत्नीच निघाली खुनी, प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा

फिर्यादी पत्नीच निघाली खुनी, प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील मानकोली नाका येथे ओला कार चालकाची गळा आवळून  हत्या केल्याची घटना 1 ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. त्यानंतर पत्नीच्या फिर्यादीवरून नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असता खुद्द फिर्यादी पत्नीच या हत्येच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने प्रियकरासोबत विवाह करण्यासाठी पती घटस्फोट देत नसल्याने त्या रागातून प्रियकर व मैत्रिणीच्या मदतीने कट रचून घरातील दागिने गहाण ठेवून दोघा जणांना एक लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. 


प्रभाकर पांडू गंजी (वय 42 वर्ष) असे हत्या झालेल्या ओला कार चालकाचे नाव असून या गुन्ह्यात पत्नी श्रुती प्रभाकर गंजी फिर्यादी (32 रा. कणेरी), प्रियकर नितेश गोवर्धन वाला (वय 28, रा. भादवड), मैत्रीण प्रिया सुहास निकम (वय 32 रा. वेताळपाडा) असे या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे असून हत्या करणारे दोघे सुपारी किलर फरार असून त्यांचा तपास नारपोली पोलीस करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post