राज्यात आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम...


राज्यात आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम...मुंबई: हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज आणि उद्या महाराष्ट्र, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिली आहे. तर, आजच्य दिवसासाठी यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अँलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, बुलडाणा, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे.


19 ऑगस्टला राज्यातील पावसाची स्थिती...

उद्या महाराष्ट्रात बुलडाणा, अकोला, वाशिम, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यांना यलो अँलर्ट देण्यात आला आहे. तर 20 ऑगस्टला अमरावती आणि नागपूरला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर, उर्वरित महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post