मुळा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे, हर्षदा काकडे यांची मागणी

 

मुळा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे, हर्षदा काकडे यांची मागणीनगर: पाऊस लांबल्यामुळे शेतातील उभे पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. यामुळे मुळा धरणातून पाण्याचे एक आवर्तन शेवगाव-पाथर्डी तालुक्यासाठी तात्काळ सोडण्याची मागणी शेतकर्‍यांची आहे. जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांची भेट आर्वतनाच्या प्रश्‍नावर चर्चा केली.

दरम्यान आर्वतनाच्या मुद्द्यावर कार्यकारी अभियंता पाटील यांनी लवकरच कार्यवाही करण्याचे आश्‍वासन शेतकर्‍यांना दिले. यावेळी रज्जाक शेख, पंढरीनाथ यादव, चंद्रकांत पुंडे, मारुती पांढरे, बाळासाहेब दिंडे, कुंडलिक पांढरे, मळू पांढरे, एकनाथ पांढरे, सुरेश पांढरे, बालाजी शिंगाडे, लहानु पांढरे आदी उपस्थित होते.चालू हंगामामध्ये शेवगाव तालुक्यातील चव्हाणवाडी, दिंडेवाडी, वाघोली, आव्हाने बुद्रुक, आव्हाने खुर्द, वडुले खुर्द, अमरापूर, फलकेवाडी, ढोरजळगाव, भातकुडगाव, भायगाव, हिंगणगावने, खामगाव, गरडवाडी, निंबेनांदुर, जोहरापूर या गावामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत.

या पिकांसाठी शेतकर्यांनी सर्व लागवडीचा आणि खताचा खर्च मोठ्या प्रमाणात केला आहे. सध्या कापूस, तूर, कांदे, भूईमूग, सोयाबीन, उडीद तर जनावरांच्या चार्‍यासाठी मका आदी पिके घेतलेली आहेत. गेल्या महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने सदरची पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post