प्रत्यक्षातील 'देवमाणूस'... प्रेयसी व पत्नी दोघींचाही काढला काटा

 प्रत्यक्षातील 'देवमाणूस'... प्रेयसी व पत्नी दोघींचाही काढला काटासातारा : प्रेयसी, पत्नीचे खून पाडत सुटणारा टि.व्ही.वरील देवमाणूस प्रेक्षक पाहत आहे. या सिरीयलसारखाच काहीसा भासणारा प्रकार सातारा जिल्ह्यात समोर आला आहे.  वाई तालुक्यात दुहेरी खुनाची थरारक घटना उघडकीस आली आहे. वाई तालुक्यातील व्याजवाडी परिसरात नितीन गोळे या आरोपीने आपली पत्नी आणि प्रेयसी अशा दोघींचाही खून केला आहे. 3 ऑगस्ट रोजी प्रेयसीचा खून केल्यानंतर नितीन गोळेने 2019 मध्ये आपल्या पत्नीचाही खून केला व तिला ओढ्यात पुरल्याचं समोर आलं आहे. हे दोन्ही गुन्हे आरोपीने कबूल केले आहेत.  पोलिसांनी आरोपीला कर्नाटकमधून ताब्यात घेतले आहे. 

आरोपी नितीन गोळेने 3 ऑगस्टला प्रेयसी संध्या शिंदे हिचा खून करून तिचा मृतदेह शेतात लपावला होता. या प्रकारणाचा भुईंज पोलिसांनी तपास केल्यानंतर सर्व प्रकरण उजेडात आले. भुईंज पोलिसांनी आरोपी नितीनला कर्नाटकमधून ताब्यात घेतले. तसेच त्याची सखोल चौकशी केली. त्यानंतर पोलीस तपासात 2019 मध्ये नितीन गोळेने पत्नी मनीषा गोळे हीचादेखील खून केल्याचे समोर आले. आरोपी नितीनने पत्नीचा खून करून तिचा मृतदेह शेताच्या बाजूला असलेल्या ओढ्यात पुरला होता.

पोलिसांनी नितीन गोळेची पत्नी मनीषा गोळे यांचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता, त्या ठिकाणी जाऊन खोदकाम सुरु केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी तसेच पोलिसांचे पथक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post