चित्रा वाघ यांचे खुले आव्हान...रोज १०० गुन्हे दाखल करा, मी बोलणारच!

 चित्रा वाघ यांचे खुले आव्हान...रोज १०० गुन्हे दाखल करा, मी बोलणारच!



मुंबई : भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ  यांच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख  यांनी गुन्हा दाखल केलाय. चित्रा वाघ यांनी बीडच्या शिरुरमध्ये येऊन माझी नको ती बदनामी केली, असा आरोप करत शेख यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावर आता चित्रा वाघ यांनीही मेहबूब शेख यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महिल्यांवर अत्याचार करण्याऱ्यांबाबत भाष्य केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर असे दिवसाला 100 गुन्हे दाखल करा, असं आव्हानच चित्रा वाघ यांनी शेख यांना दिलं आहे. 

“आज मी चिपळूणला आहे व मला बरेच जणांचे फोन येताहेत कि शिरूरकासार येथे मेहबूब शेख च्या तक्रारीवर माझ्यावर गुन्हा दाखल केलाय. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर भाष्य केलं म्हणून राज्यात माझ्यावर गुन्हा दाखल होतं असेल तर असे दिवसाला 100 गुन्हे दाखल करा. पण मी बोलत रहाणार.. लडेंगे..जितेंगे”, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post