....तर आजही राजीनामा देण्यास तयार...खा.विखे यांचे खुले आव्हान...

....तर आजही राजीनामा देण्यास तयार...खा.विखे यांचे खुले आव्हान...नगर: कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता आम्ही डॉ.तनपुरे कारखान्याचे तीन हंगाम पार केले आहेत. कोणीही कर्ज न घेता एक हंगाम चालू करून दाखवा, मी खासदारकीचा राजीनामा देईल. कामगार व सभासदांवर आम्ही नेहमी प्रेम केले आहे. त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मात्र, कामगारांचे सध्या आंदोलन सुरू आहे. त्यास काहीजण पाठिंबा देत आहेत. ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांना संचालक करून कारखाना चालत असेल तर आमची आजही राजीनामा देण्याची तयारी आहे, असं आव्हान खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.

डॉ. तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीऐवजी हा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी राज्य शासनाने राहुरी बाजार समितीला ज्या कायद्यानुसार मुदतवाढ दिली, तोच कायदा डॉ. तनपुरे कारखान्याच्या बाबतीत लावून संचालक मंडळाला राज्य शासनाने मुदतवाढ द्यावी, म्हणजे कारखाना सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल, जो न्याय प्राजक्त तनपुरेंना दिला, तोच समान न्याय सुजय विखेंना द्या, असे आवाहन करतानाच निवडणूक घ्यायची असेल तर ती काही महिने आधी घ्या, अशी मागणी आम्हीच निवडणूक आयोगाकडे केली होती. असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी राहुरी येथील शेतकरी सभासदांच्या मेळाव्यामध्ये केले.डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा व शेतकर्‍यांचा मेळावा राहुरी येथील येथे माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे मार्गदर्शक तज्ज्ञ संचालक खा. डॉ. सुजय विखे, चेअरमन नामदेवराव ढोकणे, माजी चेअरमन व विद्यमान संचालक उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन दत्तात्रय ढुस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.


माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले, काल मंत्र्यांनी मुदतवाढ मिळणार नाही, अशी घोषणा केली. मात्र, त्यांच्या हातात ज्या संस्था आहेत, त्यांना मुदतवाढ दिली जाते. मग तनपुरे कारखान्याला मुदतवाढ का नाही? असा सवाल त्यांनी केला. तनपुरे यांच्याकडे कारखान्याची सत्ता आली, त्यावेळी मोठ्या प्रमाणात साखर विक्रीसाठी शिल्लक होती. साखर विक्री झालेले पैसे जिल्हा बँकेला न भरल्याने कारखान्यावरचा बँकेचा बोजा वाढत गेला. त्यामुळे नाईलाज म्हणून प्रशासकाची नियुक्ती करावी लागली. आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून मदत केली तरी कोणालाही हारतुरे घेऊन बोलावले नाही. तुम्हीच हा कारखाना बंद पाडला, असा टोला कर्डिले यांनी नामदार प्राजक्त तनपुरे यांना लगावला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post