बेकायदेशीरपणे 'ट्रिपल तलाक'....पतीसह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल

 बेकायदेशीरपणे ट्रिपल तलाक....पतीसह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल



पुणे : पैसे व मोटार न दिल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच विवाहितेला तीन तलाकची नोटीस पाठवून बेकायदेशीर तलाक दिला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पती शोएब अथर सिद्दिकी (वय ३६), सासरा अथर सिद्दिकी (वय ७२), सासू (वय ६५, सर्व रा. भोपुरारोड, साहिबाबाद, गाजियाबाद, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित विवाहिता व आरोपी शोएब यांचे मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे लग्न झाले होते. त्यानंतर आरोपींनी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला.


सासू-सासऱ्यांनी विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केला. पैसे, मोटार न दिल्याने पतीने विवाहितेला तीन तलाकची नोटीस पाठवून बेकायदेशीर तलाक दिला. तसेच विवाहितेचे स्त्रीधन परत केले नाही. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post