जिल्ह्यात खळबळ.....नदीपात्रात वाहून आले मायलेकराचे मृतदेह, आत्महत्या की घातपात?

 नगर जिल्ह्यात खळबळ.....नदीपात्रात वाहून आले मायलेकराचे मृतदेह, आत्महत्या की घातपात?नगर :  जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ठाकुर पिंपळगाव येथील नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये वाहुन येत पुलाच्या नळ्यात माय लेकराचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या का घातपात याबत उलट सुलट चर्चा असून मृत महिलेचा पती घटना घडल्यापासून पसार झाल्याने संशय व्यक्त होत आहे.

शेवगाव तालुक्यातील  ठाकूर पिंपळगाव येथे शेवगाव गेवराई राज्यमार्गावरील नदीच्या बंधाऱ्या जवळच्या पुलावर एक मुलगा आणि महिलेचे प्रेत नागरिकांना दिसून आले. आई ज्योती अंबादास सोनवणे आणि दिपक अंबादास सोनवणे (वय-8) असे मृतांची नावं आहे.

ज्योती आणि दिपक सोनवणे हे आई, मुलगा, पती अंबादास सोनवणे व महिला असे चार जण घरामधून रविवार दुपारी १ वाजेच्या सुमारास बाहेर गेले होते. रात्री उशीरा अंबादास सोनवणे हे एकटेच घरी आले. त्याने मुलगी प्रियंका हिच्याकडे तुझी आई व मुलगा घरी आले नाही का असं विचारलं. ती नाही म्हटल्यावर प्रियंका हिला घेवून अंबादास सोनवणे हे बोधेगाव पोलीस दुरक्षेत्रमध्ये जावून ज्योती व दिपक सोनवणे हे दुपारपासून गायब झाले असल्याची माहिती दिली.

मुलीला घरी सोडून ते  आईला व मुलाला पाहतो असे सांगून घरामधून निघून गेले. ते पुन्हा घरी आले नाहीत. गावातील नागरिक व नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र माय लेकरं कुठेही सापडले नाहीत. रात्री परिसरात पाऊस झाल्याने सकाळी शेवगाव- गेवराई राज्यमार्गावरील ठाकुर पिंपळगाव नदीला पाणी आले. त्यामध्ये नागरिकांना दोन मृतदेह वाहत येवून पुलाच्या नळयांमध्ये अडकलेले आढळून आले.

पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले असून ते गावातील रहिवासी असल्याचे निदर्शनास आले.  पोलीसांनी मात्र अकस्मात गुन्हयाची नोंद केली आहे. परंतु, पती ही घटना झाल्यानंतर फरार झाला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post