महिला व बालकल्याण विभागात ८०० कोटींचा गैरव्यवहार, खा.राणा यांचा गंभीर आरोप

मंत्री ठाकूर यांच्या महिला व बालकल्याण विभागात ८०० कोटींचा गैरव्यवहार, खा.राणा यांचा गंभीर आरोप मुंबई : खासदार नवनीत राणा  यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर  यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यशोमती ठाकूर यांनी महिला व बालकल्याण विभागात 800 कोटींचा घोटाळा केला, असा खळबळजनक आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी याप्रकरणी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रार केली आहे. उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या कंत्राटदाराला बालकांच्या पौष्टिक आहाराचा ठेका दिल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.


नवनीत राणा यांच्या गंभीर आरोपांवर यशोमती ठाकूर यांनी फेसबुक लाईव्ह येत याप्रकरणावर खुलासा केला आहे. यावेळी यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राचा आणि अंगनवाडीताईचा नवनीत राणा यांनी अपमान केला आहे, असं यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post