शिक्षकांचे 'गणित'च वेगळं... सभा ऑनलाईन होऊनही संचालकांना ३० लाखांचा प्रवासभत्ता


शिक्षकांचे गणितच वेगळं... सभा ऑनलाईन होऊनही संचालकांना ३० लाखांचा प्रवासभत्ता नगर: जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेवर करोनाचा काळ असल्यामुळे  सत्ताधारी मंडळाला राज्य सरकारकडून अभय मिळाले असल्याने याच संधीचा फायदा घेत सत्ताधारी मंडळी सभासदहिताच्या पोकळ गप्पा मारत फक्त स्वत:चे खिसे भरण्याचेच काम करत आहेत. करोना काळात ऑनलाईन सभा असताना लाखोंचा प्रवास भत्ता कसा? असा सवाल शिक्षक परिषदेच्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आर.पी. राहाणे यांनी केला आहे.

करोना काळात शिक्षक बँकेच्या  गत आर्थिक वर्षात लेखापरीक्षण अहवालानुसार  12 ऑनलाईन मासिक सभा झालेल्या आहेत. तसेच तीन विशेष सभा व एक वार्षिक सर्व साधारण सभा ती सुद्धा आभासी ऑनलाईन पद्धतीने झाली आहे. तरीही या सत्ताधारी संचालकांनी प्रवास भत्ता व मिटींग भत्यापोटी तब्बल 30 लाख 90 हजार एवढा खर्च केल्यामुळे संचालक मालामाल झाले आहेत.


या बँकेचे  21 संचालक असून झालेला खर्च 30 लाख 90 हजार हा बारा महिन्यांत खर्च झालेला आहे. म्हणजे प्रती संचालक तब्बल 1 लाख 47 हजार 146 रुपये खर्च केलेला आहेत. राज्यातील सर्व सहकारी बँकामध्ये शिक्षक बँक ही एकमेव बँक असेल की जिचे संचालक दर वर्षाला तब्बल 1 लाख 47 हजार रुपये प्रवास भत्ता घेतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post