करोना काळातील पाणीपट्टी, घरपट्टी माफ होणार? सर्व नगरसेवकांना वाकळे यांचे आवाहन

 

करोना काळातील पाणीपट्टी, घरपट्टी माफ होणार? सर्व नगरसेवकांना वाकळे यांचे आवाहननगर:   महानगरपालिकेची सभा  गुरूवार दि.१२ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन होणार आहे. या सभेतील अजेंड्यावरून भाकपचे शहर सेक्रेटरी भैरवनाथ वाकळे, यांनी नगरसेवकांना महत्वाचे आवाहन केले आहे. वाकळे यांनी म्हटले आहे की,

 सभेच्या अजेंड्यावर यामधे विषय क्रमांक- २२ हा नागरिकांच्या हिताविरूध्द आहे. मनपा हद्दीतील सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार व व्यापारी बांधवांना संकटात टाकणारा आहे. त्यामुळे हा ठराव आपण बहुमताने रद्द करावा.

    मुळात जगभरातील सामान्य माणुस कोरोना संकटाने मोठ्या अडचणीत आलेला आहे. त्याचा रोजगार गेलेला आहे. नोक-या गेल्या आहेत. व्यापार धंद्याचे मोठे नुकसान झालेले आहे. तो आर्थिक आणि मानसिक संकटात आहे. याकाळात त्याला दिलासा देण्याऐवजी आपण लोकप्रतिनिधी म्हणवणारे खुशाल घरपट्टी पाणीपट्टीची दरवाढ करण्यास निघालेले आहात. मुळात हा जनविरोधी विषय अजेंड्यावर यायलाच नको होता. हि बाब अत्यंत निषेधार्ह आहे, जनविरोधी आहे. याची आपण नोंद घ्यावी. अवास्तव घरपट्टी पाणीपट्टी करवाढीचा विषय कोणाच्या 'इंटरेस्ट' चा आहे? हे तरी एकदा शहरातील नागरिकांना कळाले पाहिजे.

   आम्ही आपणास नम्र  मागणी करत आहोत कि, हा *विषय क्रमांक - २२ रद्द करून या ऐवजी आपण सर्वजण मिळून शहरातील नागरिकांची  कोरोना काळातील घरपट्टी पाणीपट्टी माफ करण्याचा ठराव मंजूर करावा  !*  तो शासनास पाठवुन महाआघाडी सरकारने तो मंजूर करावा.

   

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post