तपोवन रोडवरील दुकानांना आग, महापौरांनी पाहणी करीत नुकसानग्रस्तांना दिला आधार

 तपोवन रस्त्यावरील भीषण आगीमध्ये खाक झालेले  सात गाळ्यांची महापौर रोहिणी शेडगे यांनी केली पाहणी  

नगर - तपोवन रस्त्यावरील सात गाळ्यांना शनिवारी दुपारी भीषण आग लागून  गाळे पूर्णपणे खाक झाले . या ठिकाणची पाहणी महापौर रोहिणी शेंडगे यांनी केली .यावेळी माजी शहरप्रमुख संभाजी कदम ,नगरसेवक गणेश कवडे ,शाम नळकांडे ,संजय शेडगे आदी उपस्थित होते .यावेळी अनेकांना आपले अश्रू अनावर झाले होते .आपल्या डोळ्या देखत सर्वकाही जुळून खाक झाले .यावेळी महापौर रोहिणी शेडगे व शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी त्यांना आधार देत सर्व काही पुन्हा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. तसेच यावेळी अग्निशमन विभागाने तत्परता दाखवत वेळीच या ठिकाणी धाव घेतली त्याबद्दल त्यांचे कोतुक केले. तसेच तोफखाना पोलीस निरीक्षक जोती गडकरी यांचेशी सुद्धा महापौर यांनी चर्चा केली ,आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे येथील दुकानदार यांनी सांगितले . या आगीमध्ये रामेश्वर ट्रेडर्स , श्रेया लेडीज शॉपी ,जनरल स्टोअर्स ,कापडाचे दुकान आदींचा समावेश आहे 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post