शोभेचे पद भूषविण्यात मजा नाही, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांचा राजीनामा

शोभेचे पद भूषविण्यात मजा नाही, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांचा राजीनामा नगर: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य नेतृत्वाने नगर जिल्ह्यात पदाधिकारी निवडीबाबत घेतलेल्या चुकीच्या धोरणामुळे संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष उर्फ बापूसाहेब तांबे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. 

संघाचे राज्याध्यक्ष व सरचिटणीस यांच्याकडे तांबे यांनी आपला राजीनामा पाठविला आहे. केवळ शोभेचे पद भूषविण्यात मजा नसल्याचे सांगताना राज्य नेतृत्वामुळेच संघाची दुरावस्था झाल्याचा आरोप करत राज्य नेतृत्वाला संघाची आणखी किती शकलं करायची असा खळबळजनक सवालही तांबे यांनी विचारला आहे. 


जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी पाठविलेला राजीनामा म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील व राज्यातील सर्व संघ प्रेमी शिक्षकांची माफी मागून मी जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचा निर्णय घेत आहे. नगर जिल्ह्यात राज्य नेतृत्वाने पदाधिकारी निवडीबाबत जे चुकीचे धोरण घेतलं आणि घेत आहे त्यामुळे मन विषण्ण होऊन नुसतं शोभेचं पद भूषवण्यात मजा नाही म्हणून आज मी राजीनामा देत आहे. मागील वर्षी एका विरोधी संघटनेच्या महाभागाच्या नावाने राज्य नेतृत्वाने संघाच्या जिल्हाध्यक्षपदाच पत्र काढल.   

संघटना कार्यकर्त्यांचे आक्रमक रुप पाहून त्याने हे पद नाकारत काढता पाय घेतला...... अशी लाजिरवाणी घटना मला वाटतं राज्यात पहिल्यांदाच घडली असावी. राज्य नेतृत्व जिल्ह्यात कार्यकारणी करू देत नाही, दुसरी कार्यकारीणीही करत नाहीत.

केंद्र प्रतिनिधी म्हणून संघाच्या कामास सुरुवात केलेला मी एक संघ शिलेदार. संघाची विचारधारा वाडीवस्तीवरील शिक्षकापर्यंत रुजवण्याचं काम सातत्याने करत आलोय. विस्ताराने मोठ्या असलेल्या आमच्या अहमदनगर जिल्ह्यात संघाच्या वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केला. महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक शिक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा संघ...... आज राज्य नेत्यांच्या तुघलकी धोरणांमुळे सीमित होताना दिसतोय. 

संघाची होत चाललेली परवड थांबेल असे दूर-दूर पर्यंत ही वाटत नाही, असंही त्यांनी नमूद केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post