कॉंग्रेसला मोठा धक्का... महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा पक्षाला 'रामराम'

 

कॉंग्रेसला मोठा धक्का...  महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष  सुष्मिता देव यांचा पक्षाला 'रामराम'नवी दिल्ली: महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष  सुष्मिता देव  यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सोमवारी सकाळी एक पत्र पाठवलं आहे. आपल्या पत्रालाच राजीनामा समजण्यात यावं, अशी विनंती देखील सुष्मिता देव यांनी केली आहे. आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा  राजीनामा देत असल्याचं त्यांनी यात नमूद केलं आहे. तसेच, पक्षातील इतर सदस्यांचे, नेत्यांचे त्यांनी आभार मानले आहे. सुष्मिता देव यांनी पत्रात म्हटलं आहे की, “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत गेल्या तीन दशकांचा माझा प्रवास मला कायम लक्षात राहील. या निमित्ताने मी पक्षाचे, पक्षाच्या सर्व नेत्यांचे, सदस्यांचे आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानते. माझ्या या प्रवासात तुम्ही सर्वजण माझ्यासोबत होतात”.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post