१४ जिल्ह्यात ॲक्टीव रूग्णसंख्या १०० च्या खाली.... राज्यात करोनाचा आलेख घटला

 

१४ जिल्ह्यात ॲक्टीव रूग्णसंख्या १०० च्या खाली.... राज्यात करोनाचा आलेख घटलामुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ  लागली आहे. आज 18 ‌रोजी 5,132 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 196 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 09 हजार 364 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.93टक्के आहे. 

राज्यात आज 158 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 37 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  58 हजार 069 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (0),  धुळे (6), परभणी (15), हिंगोली (75),   नांदेड (50), अमरावती (84), अकोला (27), वाशिम (3),  बुलढाणा (37), यवतमाळ (13), वर्धा (5), भंडारा (5), गोंदिया (2),  गडचिरोली (32) या चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 325 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post