महाविकास आघाडीत धुसफूस, शिवसेनेच्या 'या' पालकमंत्र्याविरोधात कॉंग्रेसची तक्रार

 

महाविकास आघाडीत धुसफूस, शिवसेनेच्या मंत्र्याविरोधात कॉंग्रेसची तक्रारयवतमाळ: शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीवर टीका केल्यानंतर आता काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी थेट राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. शिवसेनेचे पालकमंत्री आघाडीचा धर्म पाळत नसल्याची तक्रार ठाकरे यांनी वडेट्टीवारांकडे केली आहे. त्यामुळे आघाडीत शिवसेनेची राष्ट्रवादी विरोधात तर काँग्रेसची शिवसेनेविरोधात नाराजी असल्याचं उघड झालं आहे. 


यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना काँग्रेसला सापत्न वागणूक देत आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा एकच आमदार आहे. काँग्रेसचे प्राबल्य अधिक आहे. तरीही या मतदारसंघात शिवसेनेचा धुडगूस सुरू आहे. जिल्हास्तरीय समित्यांमध्ये काँग्रेसला योग्य स्थान दिलं जात नाही. तसेच शिवसेनेचे पालकमंत्री आघाडी धर्म पाळत नाहीत. त्यामुळेच माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसचे जिल्ह्याचे संपर्क मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे शिवसेनेच्या पालकमंत्री आणि आमदाराची तक्रार केली आहे. कांग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत माणिकराव ठाकरे बोलत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post