जादूटोणा करून पैसे दुप्पट करायला गेला आणि साडेचार लाखांना गंडला... नगर जिल्ह्यातील प्रकार

      

जादूटोणा करून पैसे दुप्पट करायला गेला आणि साडेचार लाखांना गंडलाश्रीगोंदा:  जादु टोण्याचा चमत्कार करुन क्षणात दाम दुप्पट करुन देण्याच्या नावाखाली श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाट्यावर साडे चार लाखास फसवणूक केल्या प्रकरणी संतोष साहेबराव देवकर, अशोक फकीरा चव्हाण (रा.थेऊर ता.हवेली जि.पुणे) या भोंदूंना श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात जेलची हवा दाखविली आहे.

            पोलिसांनी एक मोटारसायकल दोन मोबाईल व ३ लाख ७५ हजाराची रोकड जप्त केली.दत्तात्रय शेटे (रा.करमाळा) हे कर्जबाजारी झाले होते. हे या भोंदूंना समजले. त्यांनी तुम्हाला क्षणात दाम दुप्पट करुन देतो. साडे चार लाखात नऊ देण्याचे ठरले.हिरडगाव फाट्यावरचे ठिकाण निश्चित करण्यात आले. आणि दत्तात्रय शेटे यांनी मित्राकडून साडे चार उसणे घेतले आणि दि. १३ आॅगस्टला हिरडगाव फाट्यावर पैसे आणि फुले,काळी बाहुली, तांदुळ, गुलाल ,बुक्का घेऊन आले. गाडीच्या डिक्कीत पैसे व पेटी ठेवली .हिरडगाव फाट्यावर भोंदूंनी गाडीच्या डिक्कीतील पैसे काढून घेतले. डिक्की लावली घरी जाई पर्यत डिक्कीतील पेटी उघडू नका अन्यथा पैसे दुप्पट होणार नाही त्यामुळे शेटे यांनी करमाळ्याला जाई पर्यंत डिक्की उघडली नाही. घरी गेल्यावर पेटी उघडली आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
            पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर ,सहायक पोलीस उपनिरीक्षक अकुंश ढवळे , गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे ,अमोल कोतकर ,प्रशांत राठोड यांनी कौशल्याचा वापरुन थेऊर येथील एका मंदीरात लपलेल्या दोन्ही भोंदूंना अटक केली

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post