भारतात अमेरिकेतील 'या' लशीच्या वापराला मंजुरी, सिंगल डोसच पुरेसा

 

भारतात अमेरिकेतील 'जॉन्सन अँड जॉन्सनच्या' लशीच्या वापराला मंजुरी, सिंगल डोसच पुरेसामुंबई, : अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या  सिंगल डोस लशीच्या आपात्कालीन वापरासाठी भारतात मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. भारतात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी वापरण्यात या लशीचा वापर महत्त्वाचा ठरेल. भारतामध्ये मंजुरी देण्यात आलेलं हे पाचवं व्हॅक्सिन आहे. संपूर्ण जगभरात व्हॅक्सिनच्या साहाय्याने कोरोनाविरोधातील ही लढाई लढली जात आहे. 130 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारतात आतापर्यंत 49.53 कोटीपेक्षा अधिकांना व्हॅक्सिन देण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post