शेवगाव येथे हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय, पोलिसांची धडक कारवाई

 

शेवगाव येथे हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय, पोलिसांची धडक कारवाईनगर: शेवगाव येथील नेवासा रोडवर  हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर नगर पोलीस आणि पुणे येथील फ्रिडम फर्म या सेवाभावी संस्थेने संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत दोघांना अटक  करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. तर दोन मुलींची सुटका केली आहे. शनिवारी रात्री हॉटेल सागर येथे ही कारवाई केली. सचिन रूपचंद मुसावत (रा. शेवगाव), संदीप माणिक शेळके (रा. रामनगर, शेवगाव) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. फ्रिडम फर्मचे संदेश जोगेराव (रा. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

शेवगावमधील नेवासा रोडवर सागर हॉटेलवर  लहान मुली व महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती फ्रिडम फर्म या सेवाभावी संस्थेला मिळाली होती. त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन सदरची कारवाई करण्याबाबत सांगितले. अधीक्षक पाटील  यांनी याबाबत पोलीस उपअधीक्षक (गृह) बाजीराव पोवार  यांना सूचना केल्या. पोलीस निरीक्षक रणजित डेरे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे सहायक निरीक्षक सतिष गावीत, पोलीस हवालदार कांबळे व इतर कर्मचार्‍यांचे एक पथक स्थापन करून फ्रिडम फर्मच्या सदस्यांबरोबर कारवाईसाठी रवाना केले.

 पथकाने एक बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठविला. त्या ग्राहकाने इशारा दिल्यानंतर पथकाने हॉटेलमध्ये छापा  टाकून दोन मुलींची सुटका केली. पुढील तपास शेवगाव पोलीस (Shevgav Police) करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post