माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले 'या' ग्रामपंचायतीचा आदर्श सगळ्यांनी घ्या....

 दिव्यांग लाभार्थींना राखीव 5% निधीतून वस्तूचे वितरण

शेंडी ग्रामपंचायतीप्रमाणे इतरांनीही दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून द्यावे - माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले     नगर - आजही अनेक  दिव्यांग व्यक्ती  ग्रामपंचायत स्तरावरील शासकीय सवलतीपासून वंचीत आहेत.  ही अतिशय खेदाची बाब आहे. गोरगरिबांना आजही आपल्या हक्कासाठी वणवण फिरावे लागते आहे. समाजाने दिव्यांग व्यक्तीला आदराची वागणूक देऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयन्त करायला हवे तरच दिव्यांगांना समाधानाने जिवन जगण्याची उमेद निर्माण होईल. शेंडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी प्राधान्यांचे दिव्यांगांसाठी योजनांचा लाभ त्यांना मिळून दिला आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असेच आहे. इतर ग्रामपंचायतींही दिव्यांग व्यक्तींना शासकीय लाभ मिळवून द्यावे, असे आवाहन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

     नगर तालुक्यातील शेंडी ग्रामपंचायतीने गावातील 19 दिव्यांग लाभार्थी यांना स्वनिधीतील दिव्यांगासाठी राखीव 5% निधीतून वस्तूचे वितरण माजी मंत्री शिवाजराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पारनेर सभापती दिपक पवार, शेंडीचे सरपंच सीताराम दाणी, उपसरपंच अशोक भगत, ग्रामविकास अधिकारी श्री.आतकर, पोखर्डीचे सरपंच  रामेश्वर निमसे, रुद्र अपंग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. वसंत शिंदे, महिला जिल्हा अध्यक्षा आशाताई गायकवाड, जिल्हा सरचिटणीस  दिपालीताई पडोळे,  सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे,  ग्रा.पं. सदस्य अविनाश शिंदे, सोसायटी चेअरमन संतोष शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post