नगर जिल्ह्यात महिलांकडून ७२१ किलो गांजा जप्त... किंमत फक्त 'इतके' लाख रुपये

शंकरवाडीत ७२१ किलो गांजा जप्त,  किंमत....५७ लाख ६९ हजार १३६ रुपये नगर: पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी येथे आज पहाटे गोपनीय खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहिती द्वारे मा. पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधीकारी सुदर्शन मुढे यांनी मौजे शंकरवाडी गावचे शिवारात बापू आव्हाड,साहेबराव आव्हाड, गोरख आव्हाड, विलास आव्हाड  व त्याचे घरातील इतर सदस्य यांनी त्यांच्या घरात व ऊसाचे शेतात मोठ्या प्रमाणात गांज्या लपवून ठेवला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने  उपविभागीय पोलीस अधीकारी श सुदर्शन मुढे सो. शेवगाव विभाग यांनी त्यांचे पथकात पो.ना  संजय बड़े चा.पो.हे. काँ/ अकोलकर, असे यांचे पहिले पथक, पाथर्डी पोलीस स्टेशनचे  पो.नि  सुहास बी. चव्हाण, स.पो.नि. आर.डी कायंदे, पो. ना ए.बी बडे, पो.कॉ देविदास तांदळे, पो.कॉ  भगवान सानप, प्रतिभा नागरे,  ई.एस बुधवंत, चा.पो. हे को  सुदुक,  संजय बड़े तसेच सोनई पोलीस स्टेशनचे स.पो.नि थोरात सो. पो.को/टोंबरे, पो.को/वाघमोडे, पो.ना/मुळे, पो.कॉ/ थोरात तसेच शनीशिंगणापुरचे स.पो.नि. श्री बागुल, म.पो.को नवगिरे, म.पो.कॉ/राठोड, म.पो.कॉ/काले यांचे पथक तयार करुन सदर ठिकाणी जावून कारवाई केली असता सदर ठिकाणी दोन महिला आरोपी नामे- १) सुमन साहेबराव आवाड वय ४० वर्ष रा. शंकरवाडी ता. पावडी २) सावित्राबाई बापू आवाड वय ६५ वर्षे रा. शंकरवाडी ता. पाथर्डी मिळुन आल्याने त्यांचे ताब्यात ७२११४२ किलो ग्रॅम वजनाचा अंदाजे ५७ लाख ६९ हजार १३६ रुपयेथा गांज्याचा अंमली पदार्थाचा बाहेरुन आलेला साठा मिळून आला आहे. तसेच सदर महिलेकड विचारपुस करता सदरचा गांज्याचा साठा हा १) नारायण भालके (पुर्ण नाव माहिती नाही) २) बाळासाहेब उर्फ बबन दहातोंडे (पूर्ण नाव माहिती नाही) दोघे रा. बांदा ता. नेवासा जिल्हा अहमदनगर यांचा असून तो आमचे शेतात ठेवून ३) बापु आव्हाड , ४) साहेबराव आव्हाड, ५)गोरख आव्हाड, ६) बिलास आव्हाड सर्व रा. शंकरवाडी ता. पाथडी यांना राखण करण्यास दिला होता. असे कळविले आहे.तरी दोन महिला आरोपी अटक करून मुद्देमाल जपत केला असून पुढिल तपास मा.पो.नि श्री सुहास वी चव्हाण सो. पाथर्डी पो.स्टे हे करीता आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post