एसबीआयची संपर्कविरहित सेवा, 44 कोटी ग्राहकांसाठी महत्वाचे नंबर जारी

 

एसबीआयची संपर्कविरहित सेवा, 44 कोटी ग्राहकांसाठी महत्वाचे नंबर जारीनवी दिल्ली :  SBI मध्ये खाते आहे, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी संपर्कविरहित(contactless) सेवा सुरू केलीय. आता वापरकर्ते घरी बसून फोनवर बँकेशी संबंधित अनेक कामे करू शकतील. बँकेने ट्विट करून या नंबरची माहिती दिली आहे.


एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी टोल फ्री क्रमांक जारी केलेत. भारतीय स्टेट बँकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की घरी राहा, सुरक्षित राहा. आम्ही तुमच्या सेवेसाठी तिथे आहोत. एसबीआय तुम्हाला संपर्कविरहित (contactless) सेवा देते, जी तुम्हाला तुमच्या तत्काळ बँकिंग गरजा पूर्ण करण्यात मदत करेल. आमच्या टोल फ्री क्रमांकावर 1800 112 211 किंवा 1800 425 3800 वर कॉल करा.


एसबीआयने आपल्या ट्विटसह एक व्हिडीओ जारी केलाय. असे सांगण्यात आले आहे की, या नंबरवर कॉल करून घरी बसलेल्या ग्राहकांना कोणत्याही सेवांचा लाभ घेता येईल. व्हिडीओनुसार, खाते शिल्लक आणि शेवटच्या 5 व्यवहारांसाठी या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता, एटीएम स्विच ऑन किंवा ऑफ करू शकता, एटीएम पिन किंवा ग्रीन पिन जनरेट करू शकता, नवीन एटीएमसाठी अर्ज करू शकता. SBI चे 44 कोटी पेक्षा जास्त ग्राहक आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post