बीड जिल्ह्याचं नाव केलं... मुंडे साहेबांच्या लेकीनं, पंकजा मुंडे गाण्यानं भारावल्या... videoमुंबई:  

नका वागू रे बेकीनं, राहा विचार एकीनं,

बीड जिल्ह्याचं नाव केलं, लोकनेत्याच्या लेकीनं,

बीड जिल्ह्याचं नाव केलंsss मुंडे साहेबांच्या लेकीनं

मंत्रिपदावर असताना नाही कशाचीच हाव,

काय सांगतात जनतेला तुमचं हावं प्रेम व्हावं

मनोभावे सेवा करीन, तुमची रात्रं आणि दिन

बीड जिल्ह्याचं नाव केलं, लोकनेत्याच्या लेकीनं

 माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर गएक गाणं लिहिण्यात आलं आहे. किशाबाई सौंदरमल  यांनी हे गाणं गायलं आहे. किशाबाई आणि त्यांचा मुलगा प्रथम सौंदरमल यांनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेतली. पंकजा मुंडेंसमोर किशाबाईंनी गाणं गायिलं. 

पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. पंकजा मुंडे म्हणाल्या, “किशाबाई सौंदरमल यांची आणि माझी पहिली भेट आज झाली… मुलगा प्रथम सौंदरमल हा उत्तम लिहितो आणि मुलगी सुंदर गाते… त्यांच्या कष्टाच्या जीवनातील दोन क्षण दिलासा..”

Video


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post