आम्हाला फोडाफोडी शिकवु नका...राज साहेब तुम्ही प्रबोधनकारांचे नातू की पुरंदरेचे ते सांगा

 

राज साहेब तुम्ही प्रबोधनकारांचे नातु की पुरंदरेचे ते सांगा ः संभाजी ब्रिगेडचा सवालनगर : प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनी पुर्ण महाराष्ट्राचं प्रबोधन त्यांच्या साहित्यातुन केले आहे. त्यांनी त्यांच्या रंगो बापुची नावाच्या चाळिस पानाच्या पुस्तकात पुरंदरे यांची सर्व चालाखी ऊघड केली आहे. ते पुरंदरेच्या लेखनाला भटी लिखाण म्हणतात. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील हे कसले शाहिर हा तर सोंगाड्या आहे असे विधान केले होते. जेम्स लेन च्या नावाखाली जिजाऊंची व शिवरायांची बदनामी करणारे हेच ते पुरंदरे आहेत. प्रबोधनकरांचे आपण नातु आहात की पुरंदरेचे ते आधी एकदा स्पष्ट करावे. राज ठाकरे म्हणतात पुरंदरे ब्राह्मण असल्यांने त्यांना विरोध केला जातो. हा त्यांचा कांगावा आहे. त्यांना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही. सेतु माधवराव पगडी, त्र्यं.शं.शेजवलकर, नरहर कुरुंदकर, कॉ.शरद पाटील, डॉ.आ.ह.साळुंखे, भालचंद्र नेमाडे, डॉ.जयसिंगराव पवार, इत्यादि अनेक ज्येष्ठ इतिहास संशोधकांनी पुरंदरेंच्या इतिहासलेखनावर टीका आणि आरोप केले आहेत. ब.मो.पुरंदरे आजपर्यंत कधीही या आरोपांचे खंडन करु शकलेले नाहीत.  

तत्कालिन फडणविस सरकारने ब मो पुरंदरे यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला. त्या महाराष्ट्र भुषण पुरस्काराला देशभरातील साहित्यीक अभ्यासक दोन्ही छत्रपती तसेच सर्व शिवप्रेमींनी, अनेक सामाजिक संघटना यांनी विरोध केला होता. तरिही खुर्चीचा व सत्तेचा बळाचा वापर करित पुरस्कार दिला व त्या पुरस्काराची किमंत कमी केली. आम्ही महाविकास आघाडी सरकारला मागणी करतो की, सदरील महाराष्ट्र भुषण पुरस्कार परत घ्यावा.

महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत भाजपा सोबत युती करायची असल्याने गुजरातच्या व नागपुरच्या मालकाला खुष करण्याचे हे धंदे सुरु आहेत . पुण्यातील एक मोरे कोण आहेत त्यांनी म्हणे फिरु न देण्याची धमकी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांना दिली असं समजल. जावळीचे गद्दार असलेले चंद्रहास मोरे यांनी शिवाजी महाराजांना विरोध केला होता. त्यांचेच हे मोरे वंशज असावेत अशी शक्यता आता वाटत आहे. अन् प्रविण दादा गायकवाड हे शिवाजी महाराजांच्या घराण्याशी थेट निगडीत आहेत. प्रविणदादा गायकवाड हेच पुण्याचे नागरिक आहेत. मोरेंनीच थोडं संभाळुन रहावे. कारण संभाजी ब्रिगेडला खळखट्याक शिकवायची गरज नाही.

भांडारकर आम्हीच फोडले होते. वाघ्या आम्हीच फोडला होता. दादु कोंडदेव आम्हीच फोडला. सुदर्शन ला आम्हीच फोडले होते. गडकरीचा पुतळा आम्हीच जमिन दोस्त केला होता. त्यामुळे आम्हाला फोडाफोडी शिकवु नका. पुरुषोत्तम खेडेकर साहेब व प्रविणदादा गायकवाड हे बहुजन मराठा समाजाचे मार्गदर्शक व  दिशादर्शक आहेत त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये कोणतंही असंवेदनशील विधान खपवुन घेणार नाही असा इशारा अहमदनगर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी, अवधुत पवार, पोपटराव चेमटे, कैलास वाघस्कर, नवनाथ मोरे, माणिकराव वाघस्कर, प्रताप शिंदे, सागर जाधव, राजुभाऊ लोटके आदींनी दिला आहे.

 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post