कट्टर हिंदुत्ववादी नेते माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

 कट्टर हिंदुत्ववादी नेते माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन, बाबरी मशीद पतनावेळी होते मुख्यमंत्रीनवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन झालंय. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी लखनऊमधील पीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. आज सकाळपासून कल्याण सिंह यांचा रक्तदाब कमी होत होता. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं शनिवारी निधन झालं. 

कल्याण सिंह यांचा जन्म 5 जानेवारी 1932 रोजी झाला.

1991 मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.

कल्याण सिंह दुसऱ्यांदा 1997-99 मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.

कल्याण सिंह उत्तर प्रदेशच्या राजकारणात हिंदुत्वाचा चेहरा होते.

बाबरी मशीद पाडण्याची घटना 6 डिसेंबर 1992 रोजी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात घडली. या घटनेनंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला.

2009 मध्ये समाजवादी पक्षात सामील झाले.

26 ऑगस्ट 2014 रोजी ते राजस्थानचे राज्यपाल झाले.

1999 मध्ये भाजप सोडले, 2004 मध्ये पुन्हा भाजपमध्ये सामील झाले.

2004 मध्ये बुलंदशहरमधून भाजपचे खासदार झाले.

2010 मध्ये कल्याण सिंह यांनी स्वतःचा पक्ष जनक्रांती पार्टी स्थापन केली.

कल्याण सिंह उत्तर प्रदेशच्या अत्रौली विधानसभेचे अनेकवेळा आमदार होते.

कल्याण सिंह यांच्या निधनानंतर राज्यात शोककळा

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post