ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आहे रोड मराठा, थेट महाराष्ट्राशी आहे नातं....वाचा सविस्तर

 

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आहे रोड मराठा, थेट महाराष्ट्राशी आहे नातं....वाचा सविस्तरदिल्ली: टोकियो ऑलिम्पिक मध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकवून देणाऱ्या नीरज चोप्राचं देशभरातून कौतुक होत आहे.  या दरम्यान त्याच्या जातीवरही चर्चा होताना दिसत आहे. नीरज चोप्रा हा 'रोड मराठा' असून या जातीच नातं व मूळ थेट महाराष्ट्राशी संबंधित आहे. 

1761मध्ये नीरज चोप्राचे पूर्वज पेशवे बाळाजी बाजीराव यांच्याबाजूने पानिपतच्या तिसऱ्या युद्धात उतरले होते. अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये हे युद्ध झालं होतं. या युद्धानंतर नीरजचे पूर्वज पानिपतमध्येच थांबले.

पानिपतचं युद्ध हे एक निर्णायक युद्ध होतं. या युद्धात आप्तस्वकीयांनी अब्दालीला साथ दिली. त्यामुळे मराठ्यांचा या युद्धात पराभव झाला.

14 जानेवारी 1761मध्ये मराठ्यांचा पराभव झाला. सुमारे 50 हजार मराठा जवानांना या युद्धात वीर मरण आलं. या युद्धानंतर काही सैनिक पळून गेले. काही जण याच भागात लपून राहिले. काहींनी आपली ओळख लपवली. मात्र, ओळखू जाऊ नये म्हणून त्यांनी येथील रोड नावाच्या राजाच्या नावाने स्वत:ची ओळख सांगण्यास सुरुवात केली. तेव्हापासून पानिपतमध्ये पराभूत झालेल्या आणि याच परिसरात राहिलेल्यांना रोड मराठा म्हणून संबोधलं जाऊ लागलं, असं इतिहासकार सांगतात.

या रोड मराठ्यांनी  आपल्या प्रथा आणि परंपरांचं जतन केलं. म्हणूनच आजही रोड मराठ्यांच्या परंपरा आणि महाराष्ट्रातील प्रथा, परंपरा समान दिसतात. हे रोड मराठा हिंदी बोलतात. पण त्यांच्या बोलण्यात अधूनमधून मराठी शब्द डोकावत असतात.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post