घरी ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर पैसे कमवा... 'आरबीआय'ची खास योजना

 घरी ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर पैसे कसे कमवायचे?नवी दिल्ली:  तुमचे सोन्याचे दागिने बँकेत ठेवायचे ठरवले तर तुम्हाला लॉकरचे शुल्क भरावे लागेल. तुमच्या घरी ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांमधून तुम्ही अधिक पैसे कमावू शकता, असा एक मार्ग आहे. तुम्ही निष्क्रिय सोने RBI ने नियुक्त केलेल्या बँकेत जमा करू शकता आणि त्यावर व्याज मिळवू शकता. आरबीआयच्या सुवर्ण मुद्रीकरण योजनेअंतर्गत ही सुविधा उपलब्ध आहे. हे बँकेच्या मुदत ठेवीसारखे आहे, जिथे तुम्ही तुमचे घरी पडून असलेले सोने बँकेत जमा करता येते आणि मॅच्युरिटी झाल्यावर तुम्हाला सोने किंवा सोन्याचे मूल्य जमा व्याजासह परत मिळते.

अलीकडे एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यासह अनेक बँका ट्विटरवर आरबीआयच्या सुवर्ण मुद्रीकरण योजनेचा प्रचार करताना दिसत आहेत.

एचडीएफसी बँकेने आपल्या ट्विटरवर लिहिले, “तुमच्याकडे असलेल्या निष्क्रिय सोन्याच्या दागिन्यांवर व्याज मिळवू शकता. एचडीएफसी बँक तुमच्या निष्क्रिय सोन्यावर  जास्त व्याज देते. एचडीएफसी बँक गोल्ड मुद्रीकरण योजनेमध्ये गुंतवणूक करा, दीर्घ मुदतीच्या ठेवींवर 2.50% आणि मध्यम मुदत ठेवींवर 2.25% मिळवा. या योजनेअंतर्गत सोन्याची किंमत मॅच्युरिटीच्या वेळी सध्याच्या किमतीवर आधारित असेल. सोन्याच्या ठेव मूल्यावर व्याज मोजले जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post