'वैशिष्ट्यपूर्ण जुन्या नोटा, नाणी द्या, कोट्यवधी रुपये मिळवा', ऑफर्स बाबत रिझर्व्ह बँकेचा खुलासा

 नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बुधवारी सर्वसामान्य लोकांना फसवणूक करणाऱ्यांविरूद्ध सावध केले. जुन्या बँक नोटा आणि नाणी खरेदीच्या विक्रीच्या ऑनलाइन व्यवहारात भारतीय रिझर्व्ह बँकेचे नाव आणि लोगोचा वापरून नागरिकांकडून अवैध्यरित्या टॅक्स किंवा कमिशन वसुली करत आहेत.सामान्य लोकांना “जुन्या नोटा आणि नाण्यांच्या खरेदी/ विक्रीच्या काल्पनिक ऑफरला बळी पडू नये.”  म्हणत ही सावधगिरी बाळगाचे आरबीआयने आव्हान केलं आहे. आरबीआयने म्हटले आहे की, केंद्रीय बँक अशा प्रकरणांमध्ये व्यवहार करत नाही आणि “कोणत्याही प्रकारचे शुल्क/ कमिशन कधीही शोधत नाही.”

“रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्याही संस्था/ फर्म/ व्यक्ती इत्यादींना अशा व्यवहारामध्ये त्यांच्या वतीने शुल्क/ कमिशन गोळा करण्यासाठी अधिकृत केलेले नाही.” आरबीआयने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, अशा काल्पनिक ऑफरद्वारे पैसे काढण्यासाठी आरबीआयचे नाव वापरून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला जनतेला देत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post