शिवसेनेचे माजी मंत्री अडचणीत ... 'तो'आवाज राठोड यांचाच


शिवसेनेचे माजी मंत्री अडचणीत ... 'तो'आवाज राठोड यांचाच पुणे : माजी मंत्री संजय राठोड  पुन्हा एकदा कॅबिनेटच्या दारापर्यंत आले होते, त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेण्याची चर्चा होती. मात्र ज्या ऑडिओ क्लिप्समुळे  संजय राठोड यांची खुर्ची गेली, त्याच ऑडिओ क्लिप्समुळे त्यांचा पाय अजून खोलात गेला आहे. एका तरुणीशी संवाद साधणारा ऑडिओ क्लिपमधील जो आवाज आहे, तो आवाज दुसरा-तिसरा कुणाचा नसून शिवसेना नेते संजय राठोड यांचाच असल्याचा दावा केला जात आहे. आवाजाची पडताळणी करणाऱ्या फॉरेन्सिक रिपोर्टमधील ही माहिती पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने  दिली आहे. त्यामुळे राठोडांच्या मंत्रिपदाचं स्वप्न तर दूरच, उलट त्यांना अटक करण्याची मागणी होऊ लागली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोडांच्या अटकेसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post