शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड आणखी गोत्यात, महिलेने दाखल केली गंभीर तक्रार

 शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड आणखी गोत्यात, महिलेने दाखल केली गंभीर तक्रारमुंबई: तरूणीच्या आत्महत्येमुळे मंत्री पद सोडावे लागलेले शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. संजय राठोड यांच्याविरोधात आणखी एका महिलेने तक्रार केली आहे. यवतमाळ पोलिसांकडे याबाबत पोस्टाने करण्यात आली आहे. संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, अशी लिखित तक्रार या महिलेने केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. 

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबत ट्विटरवर पोस्ट केली आहे. शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखित सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली आहे. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही. तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत लैंगिक छळ करतो, असं त्यात म्हटले आहे. यासोबत चित्रा वाघ यांनी या तक्रारीच्या पत्राचे दोन फोटोही पोस्ट केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post